पाथर्डी : सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी गावचे सरपंच अजिनाथ पांडुरंग दराडे यांच्यावर वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तांत्रिक कर्मचारी आदिनाथ महादेव चौधरी यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी (दि.5) तालुक्यातील मालेवाडी येथे एअर पंच केबल टाकण्याचे काम सुरू होते. दुपारी 3 वाजता मालेवाडी गावचे सरपंच अजिनाथ पांडुरंग दराडे हे तेथे आले व चौधरी यांना म्हणाले की, तुम्ही काही ठिकाणी सिंगल फेज केबल का वापरली आहे.
या कामाचे इस्टीमेट आम्हाला द्या, तुम्ही संपुर्ण गावाला थ्रीफेज केबल टाका नाहीतर तुमचे काम बंद करा. या ठिकाणी चौधरी सरपंच अजिनाथ दराडे यांच्यात बाचाबाची झाली.
यातून दराडे यांनी अजिनाथ चौधरी यांना शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर झगडे ग्रुपचे सुपरवायझर नामदेव उत्तम बोडखे रा खरडगाव ता शेवगाव यांना सरपंच खेडकर म्हणाले की,तुम्ही आमचे गावात कसे काय आले, तुम्ही काम बंद करुन टाका, नाही तर वायरमन आदीनाथ चौधर यांना व तुम्हाला येथेच जिव मारुन टाकू अशी धमकी दिली.
त्यावेळी झगडे ग्रुपचे कामगार संतोष काशिराम पावरा याला जम्प कट करणेसाठी सांगितल्याने तो पोलवर चढला असता त्यास अजिनाथ दराडे यांनी धमकी देवून एका घरात कोंडून ठेवले व थोड्या वेळाने सोडून दिले, असे फिर्यादित म्हटले आहे.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील करीत आहे.
Post a Comment