पुणे ः गंभीर आजारी असताना आयसीयुतून खासदार गिरीश बापट यांना नळी लावून प्रचारात आणले. जनाची नाही मनाची तरी बाळगायला हवी होती. कुठल्या स्तरावर ही मंडळी जातात, हे जनतेने पाहिले. माणस जोडायची असतात; तोडायची नसतात. भाजप निवडणुकीत कुठल्याही स्तरावर जाते, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका केली.
चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केली. यावेळी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार सुनिल शेळके, आमदार राजेश राठोड, कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, अजित गव्हाणे, सचिन भोसले, कैलास कदम, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, राज्य सभा व विधानपरिषदेसाठीही मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असताना मतदानासाठी अम्ब्युलन्समधून आणले होते. एक-दोन मते कमी पडल्याने फरक पडला असता का? किती स्वार्थी असावे. स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या जीवाकडे न पाहणारी ही माणसं आहे, अजित पवार म्हणाले.
पवार यांच्या भाषणामुळे भाजपाचे राजकारण कसे आहे, हे सर्वांचा समोर आलेले आहे. बापट यांना प्रचारात आणून भाजपने मते वळतील, अशी अपेक्षा धरली होती. मात्र तसे होणार नसल्याचे दिसून येत आहे. बापट यांना रु्ग्णालयात आराम करून देण्याऐवजी त्यांना प्रचारात सहभागी करून घेतल्याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यातच अजित पवार यांनी तो मुद्दा धरून भाषण केलेले आहे. हे भाषण भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आवडले असून त्यांनी या भाषणाचे स्वागत केलेले आहे. वरिष्ठ नेत्यांनी तरी या गोष्टीचे गांभिर्य घ्यायला हवे होते, असे भाजप कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
Post a Comment