खरेदी विक्री संघाचा प्रचार सोशल मीडियावर... नेत्यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबवल्याने सर्वसामान्य मतदारांना गॄहित धरले

 अमर छत्तीसे

श्रीगोंदा ः तालुक्यातील खरेदी विक्री संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या १२फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबवल्याने सर्वसामान्य मतदारांना गॄहित धरल्याचे दिसून येत आहे.


खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकमेकांचे तोड न पाहणारे नेतेमंडळी एकत्र आले पण दोन जागा वगळता इतर जागांवर निवडणूक लागली आहे. या सर्वपक्षीय आघाडीमुळे गावपातळीवरील कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे. 
 
या निवडणुकीची फक्त औपचारिकता पार पाडायची असे नेत्यांनी ठरवले असल्यामुळे मतदारांचा भाव वधारला आहे. या निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावर चालू दिसतो. या संदर्भात जे मतदार आहेत. ते सर्वच सोशल मीडियावर सक्रिय आहेत, असे नाही. ग्रामीण भागातील वयोवृद्ध मतदार संख्या जास्त आहे. त्यांच्यापर्यंत प्रचार यंत्रणा पोहचली नाही. किमान उमेदवाराचे चिन्ह तरी मतदारांपर्यंत पोहचणे गरजेचे असते.  सर्वच नेत्यांनी निवडणूक एकतर्फी असल्याचे चित्र निर्माण केल्याचे दिसून येते. 
 
या प्रचारात फक्त"शेठ" भाऊ यांचीच यंत्रणा दिसून येते मग ही यंत्रणा वैयक्तिक साठी राबते का? पूर्ण पॅनलसाठी हे मात्र गुपित आहे. नेत्यांच्या गॄहित धरण्याच्या भूमिकेचा परिणाम मतपेटीतून दिसून येण्याची चर्चा तालुक्यात आहे.

या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नेत्यांनी निवडणूक बिनविरोधसाठी केलेले प्रयत्न निश्फळ ठरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अपक्ष उमेदवारांचा कोणाला फटका बसतो, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या प्रचार मात्र जोमात असून मतदार कोमात जाण्याची वेळ आली आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post