तिसगावमधील आरोग्य केंद्राला आग

नगर :  तिसगाव (ता. पाथर्डी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुन्या स्टोअर रूमला अचानक आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. 


आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  ही घटना घडली आहे. अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले आहे. या आगीत स्टोअर रूम मधील जुने साहित्य व मुदत संपलेली औषधे जळाली असल्याचे समजते.  

यापूर्वी आग लागली होती. त्याचेही कारण अद्याप समजू शकले नाही. त्यातच आता येथे दुसर्यांदा आग लागली आहे. या आगीच्या घटनेवर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post