भाजपाच्या भरगच्च कार्यक्रमावर आमदार रोहित पवार यांच्या प्लेक्सने फेरले पाणी....महाविकास आघाडीच्या कामाचे श्रेय भाजप घेत असल्याची चर्चा...

नगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तास्थापनेनंतर प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. कर्जतमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा महापारेषणचे ४०० केव्हीए सबस्टेशन व कर्जत-जामखेड येथील नूतन पोलिस निवास वसाहतीचे लोकार्पण होणार आहे. असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. अशा सर्वच भरगच्च कार्यक्रमांची आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागताचा फ्लेक्स लावून हवाच काढून टाकली आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार्या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कर्जत दौर्यावर येत आहे. त्यांच्या दौर्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. देवेंद्र  त्यांच्या स्वागताची जंग्गी तयारी करण्यात आली. या सर्व तयारीची हवाच आमदार रोहित पवार यांनी कर्जतमध्ये लावलेल्या फ्लेक्सने काढून घेतली आहे. कर्जत शहरात व परिसरात सकाळपासून आमदार रोहित पवार यांनी लावलेले स्वागताचे फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहे. 

हा आहे फ्लेक्सवरील मजकूर... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे... कर्जत-जामखेड मतदारसंघात आपले हार्दिक स्वागत!महाविकास आघाही सरकारने मंजूर केलेल्या व बांधून पूर्ण झालेल्या पोलिस निवासस्थानांचे उद्घाटन आपण केल्यामुळे पोलिसांची प्रत्यक्ष राहण्याची सोय होणार आहे. याबद्दल आपले आभार!

मआवि सरकारने खर्डा व मिरजगाव हे दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर केले आहे. तेथे आवश्यक मनुष्यबळही दिल्याने कामकाजही सुरु झाले आहे. या पोलिस ठाण्यासाठी इमारत व पोलिस निवासस्थानासाठी माझा पाठपुरावा सुरु असून तो अंतिम पातळीवर आहे. त्यालाही आपण मंजुरी द्यावी, ही विनंती

कुसडगावच्या SRPF सेंटरचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले असून काहीजण ते चुकीच्या हेतूने इतरत्र हलवण्याचा प्रचन करत आहेत. येथील लोकच हलवू देणार नाहीत आणि आपणही सरकारचा पैसा वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास आहे.

मतदारसंघातील रस्ते व अध्यात्मिक-धार्मिक व इतर विकास कामांना या सरकारने दिलेली स्थगितीही आपण उठवाल, ही अपेक्षा. आजवर लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे १५ ते २०  वर्षांपासून निर्माण झालेला कर्जत-जामखेडच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रगत एक कार्यकर्ता आहे. जनतेकडे पाहून त्यास सहकार्य कराल ही अपेक्षा!आपल्याकडे सहकार्याच्या भावनेतून पाहणारे आम्ही समस्त कर्जत - जामखेडकर - रोहित पवार आमदार

या फ्लेक्सवरील मजकूराने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. हे फ्लेक्स काढून घ्यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु राम शिंदे हे रोहित पवार यांच्या कामाचे श्रेय लाटत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post