समाज माध्यमावर जातीय तेढ निर्माण करणारा व्हीडीओ व्हायरल केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा....

नगर  : सोशल मीडियाव्दारे इंन्स्टाग्रामवर एका इसमाने चित्रफीत तयार करुन दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे चित्रफितीव्दारे वक्तव्य केले बाबत कोतवाली पोलिसांना तक्रार प्राप्त झाली. त्यामध्ये आमचे धर्माविषयी काही असल्यास शिक्षा देणे कायद्याचे काम आहे.  त्यावरुन कोतवाली पोलिस ठाण्यात त्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे. 


पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परिस्थीतीचे गांभीर्य समजून नमूद आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत गोपनीय पथकातील अंमलदार यांना सूचना दिल्याने अंमलदार यांनी तात्काळ कारवाई करून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अयान अजीज शेख (रा.काटवन खंडोबा गाजीनगर अहमदनगर) यांस ताब्यात घेतले आहे. 

पुढील कार्यवाही पोसई/सुखदेव दुर्गे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोसई/सुखदेव दुर्गे, सफौ/राजेंद्र गर्गे,पोना/१००७ योगेश खामकर,पोकॉ/१४६४ अभय कदम,पोकॉ/१६१ उमेश शेरकर यांच्या गोपनीय पथकाने केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post