दौलतराव सुपेकर यांची वर्णी.....

पारनेर : शिवसेना उपतालुकाप्रमुख किसनराव सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली पठारवाडी शिवसेना पार्टीची बैठक झाली. त्यामध्ये सर्वानुमते दौलतराव सुपेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 


तत्कालीन उपसरपंच शारदाबाई बोदगे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर रिक्तपदासाठी सरपंच उर्मिला सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी एकमवे अर्ज दौलतराव सुपेकर यांचा दाखल करण्यात आला होता. 

दौलतराव सुपेकर यांच्या उपसरपंच पदासाठी सरपंच उर्मिला सुपेकर सूचक तर ग्रामपंचायत सदस्य शारदा बोदगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर टाळ्यांच्या गजरात सुपेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दौलत सुपेकर यांचे आभार मानले. या वेळी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे चेअरमन व व्हा,चेअरमन व सर्व संचालक उपस्थित होते. निवडी नंतर बोलताना सुपेकर यांनी सरपंच व सर्व सदस्यांचे आभार मानले.  

यापुढे बोलताना गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहून प्रामाणिक पने काम करत राहील अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच दौलत सुपेकर यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post