चक्रधर स्वामी प्राथमिक शाळेने गाजविली स्पर्धा...

नगर ः ग्रामीण विकास मंडळ संचलित चक्रधर स्वामी प्राथमिक शाळा नागापूर (ता.नगर) येथील लेझीम पथकाने सांगवीसूर्या (ता.पारनेर) येथील शिवजयंतीनिमित्त आयोजित डान्स स्पर्धा गाजविली.


जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी चक्रधर स्वामीच्या शिवराय आरती स्पेशल झांझ पथकासोबत शिवरायांची आरती केली. शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गातील ३० विद्यार्थ्यांच्या या पारंपरिक लेझीम खेळाचा नवीन अंदाज पाहून पंचक्रोशीतील गावकरी मंत्रमुग्ध झाले. 


शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य डान्स स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील एकूण ३५ शाळांमधील ४५ गीत सादर करण्यात आली होती. यामध्ये लेझीम पथकाने तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. शिक्षक आदेश शिरोळे यांचे मार्गदर्शक लाभले. विलास साठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post