घुले यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद...

शेवगाव : मला आपल्याशी बोलायचं आहे... मी येतोय आपणही या अशी भावनिक साद माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी घातली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत व पुढील निवडणुकीबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केलेआहे. मंगळवारी होणार्या या मेळाव्यासाठी मी येतोय आपणही या असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी कार्यकर्त्यांना केले.

या त्यांच्या भावनिक आवाहनाची जिल्हाभर चर्चा सुरु आली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच घुले यांनी ही भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

या मेळाव्याला मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post