मनेसे नेत्यावर हल्ला...

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आज पहाटेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची ही घटना घडली. धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर ४ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे.त्यांना उपचारासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. ते एकटेच होते. त्यावेळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर चार ते पाच लोक बसले होते. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. 

या टोळक्याने संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. आजुबाजूचे लोक संदीप देशपांडे यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.

मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे यांच्यावर ४ जणांनी स्टंपने हल्ला चढवला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या डोक्याला तसेच पायाला दुखापत झाली. दरम्यान, देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post