नगर : ओळखीचा फायदा घेत एका नर्स सोबत गैरवर्तन करणार्या तरुणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय पंडीत पाखरे (वय 30 रा. चिपाडे मळा, सारसनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नगर तालुक्यातील एका गावामध्ये राहणार्या पीडितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी नगर-पुणे रस्त्यावरील एका गार्डन येथे झाला. फिर्यादीची अजय पाखरे याच्यासोबत ओळख होती.
त्या बुधवारी सकाळी घरून निघून येथील एका खासगी रुग्णालयात ड्युटीसाठी येत असताना रस्त्यामध्ये अजय त्यांना भेटला व त्यांचा हात ओढून, चल मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून अंगाशी झटू लागला.
फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने त्यांना मारहाण केली. तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment