ठाणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले रोहित पवार यांच्याविरोधात अजित पवार यांनीच षडयंत्र रचल्याचा आरोप ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे समर्थक नेते नरेश म्हस्के यांनी केला होता.
म्हस्के म्हणाले की, पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब, आधी आपलं घरातलं बघा व नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा, असे वक्तव्य म्हस्के यांनी केले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार उभे होते. त्यांना पाडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे.

Post a Comment