मुंबई: मी तोंडावर एक आणि मागे एक असे कधीच वागत नाही. रोहित आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे, माझा पुतण्या असून मला मुलासारखा आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली.
शिवसेनेचे नेते प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्र क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या विरोधात अनेकांना निरोप अजित पवारांनी दिले, असा खळबळजनक गौप्यस्फोट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
पुतण्याच्या विरोधात काम करणाऱ्या काका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कसलेही आरोप करू नये असे सांगत म्हस्के यांनी अजित पवारांना लक्ष केले. यावर विरोधीपक्ष नेते आणि आमदार रोहित पवारांचे चुलते अजित पवारांना यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, कोण नरेश म्हस्के, मी असले खोटे वक्तव्य करणाऱ्यांना ओळ्खतही नाही असे म्हणत म्हस्के यांना दुर्लक्षित करत असल्याचे स्पष्ट केले.
पवार म्हणाले की, मी तोंडावर एक व मागे एक असे कधीच वागत नाही. रोहित आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे, माझा पुतण्या असून मला मुलासारखा आहे. आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नुकतेच निवडणून आले आहेत. त्यामुळे असे आरोप केले जात आहेत.

Post a Comment