श्रीगोंदा : जिल्ह्यात घडलेल्या राजकीय घडामोडींंमुळे आता जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तिकिट कोणाला मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे उमेदवार कोण याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. सध्या वेगवेगळी नावे चर्चेत असली तरी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांचे नाव आघाडीवर असून त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत घनश्याम शेलार यांचा पराभव झालेला आहे. हा पराभव नसून त्यांचा विजय असल्याचे मत आता कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. काही झाले तरी आगामी काळात होणार्या निवडणुकीत शेलार यांनाच आमदार करायचा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जिल्ह्यात चांगले यश मिळाले होते. मात्र श्रीगोंदे व शेवगाव – पाथर्डी मतदार संघात पराभव झाला. हे पराभवाचे अपयश आगामी काळात विजय मिळवून धुवून टाकायचे आहे. त्यामुळे शेलार यांचे कार्यकर्ते सध्या कामाला लागलेेले आहेत.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार नगर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, श्रीगोंदा येथे राहुल जगताप यांनी सहा महिने आधी मला निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले पाहिजे होते. त्यामुळे घनश्याम शेलार यांना पूर्ण तयारी करता आली असती व श्रीगोंदा मतदार संघात आपल्याला विजय मिळाला असता. यावरून आता तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात घनश्याम शेलार यांना आमदार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले. त्यापाठोपाठ अजित पवार जे बोलले त्यावरून आगामी निवडणुकीत शेलार यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आता अण्णांना आमदार करून स्वस्थ बसायचं असा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. मागील निवडणुकीतील चुका आता टाळून सुधारणा करून राजकीय डावपेच टाकू या असे कार्यकर्ते बोलू लागले आहे.
जिल्हा बँकेतील घडामोडीमुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. काहींच्या उमेदवारी कट होणार आहे. काही ठिकाणी नवीन चेहरे तर काही ठिकाणी तरुणांऐवजी जुन्यांना संधी मिळणार आहे. सध्या कार्यकर्त्यात चर्चा सुरु आहे.
Post a Comment