गोंदिया : शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनांनी गोंदिया जिल्हा हादरला आहे. आणखी एका विद्यार्थीनीचा शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे.
एका शिक्षकानेच विद्यार्थीनीला अश्लील चित्रफिती दाखवून लैंगिक छळ केल्याच्या या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात हा प्रकार घडला आहे.
दरम्यान तीन दिवसांपूर्वीच गोंदिया तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
याप्रकरणी आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच आता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Post a Comment