जिल्ह्यातील पर्यटन विकासास चार कोटीचा निधी...

नगर : प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सहा पर्यटन क्षेत्रास चार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.


जिल्ह्यातील आगडगाव येथील काळभैरवनाथ, केडगाव येथील रेणुकामाता देवस्थान मंदिर, जवळा येथील जवळेश्वर मंदिर, श्रीगोंदा येथील शेख मोहम्मद महाराज मंदिर, पाथर्डी येथील वृध्देश्वर देवस्थान व शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील गणपती मंदिर सुशोभीकरनासाठी असे एकूण चार कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे. 

या भागातील ग्रामस्थांची या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाची मागणी सातत्याने करत होते. त्यामुळे या करिता हा निधी विशेष प्रयत्न करून मंजूर केला असल्याचे खा. विखे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान या मंदिर परिसराचे सुशोभिकरण आता चांगल्या पद्धतीने होणार असल्याने या भागातील ग्रामस्थांनी खासदार सुजय विखे यांच्या यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post