विरोधकांना पवार कुटुंबिय समजले नाही...

नगर : विरोधकांना पवार कुटुंबीय कधी समजलेच नाही व समजणार ही नाही, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांचा समाचार घेतला.


महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनीच फिल्डिंग लावली होती असा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी केला. यामुळे राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती. आमदार रोहित पवार यांनी मात्र त्यांच्यावर पलटवार केला आहे. 

आरोप करणारी व्यक्ती फारशी कोणाला माहित नाही त्यांना महापौर करताना ते ज्या गटाचे आहेत. त्यांच्याच प्रमुखांनी विरोध केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदत केली होती, अशी आठवण रोहित पवार यांनी यावेळी म्हस्के यांना करून दिली.

पवार म्हणाले की, आज-काल नवीन नेत्यांचा ट्रेंड आला आहे. पवारांवर टीका केल्या त्याशिवाय आपण मोठे होत नाही. त्यामुळेच अशी टीका केली जाते. विरोधकांना पवार कुटुंबीय कधी समजलेच नाही आणि समजणार ही नाही अशा शब्दात पवार यांनी म्हस्के यांचा समाचार घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post