अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटणार...

नवी दिल्ली : अखिल भारतीय अंगणवाडी सेविका फेडरेशनच्या अहमदनगर जिल्ह्यातील ७२ अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे दाखल झाल्या होत्या. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांची केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची लोकसभेत भेट घडवून आणली. 


यावेळी आपल्या मागण्या मंजूर करण्याबाबत या अंगणवाडी सेविकांनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती झुबेन इराणी यांच्याकडे लेखी निवेदन दिले. या अंगणवाडी सेविकाची मागणी रास्त असून बरेच दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यावर आपण सहनभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा, अशी विनंती खासदार विखे यांनी स्मृती इराणी यांच्याकडे केली.

विखे यांनी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नात लक्ष घातल्याने त्यांचे प्रश्न सुटतील अशी आशा लागली आहे. खासदार विखे यांच्या पुढाकारामुळेच केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट झाल्याचे संघटनांच्या पदाधिकारी यांनी सांगितले.

मंत्री स्मृती इराणी यांनी या मागण्या बाबत आपण सविस्तर माहिती घेवून निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

दरम्यान थेट केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट होऊन आपल्या मागण्या बाबत त्यांच्याशी चर्चा करता आल्याबद्दल अंगणवाडी सेविका फेडरेशनच्या सेविकांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post