किरण काळे यांना बैठकीतून बाहेर काढल...

नगर :  युवक काँग्रेसच्या बैठकीसाठी आलेले काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याविरोधात युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. किरण काळे चले जाव, अशा घोषणा देत काळे यांनी बैठकीतून निघून जावे, असा आग्रह युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धरला. 


शनिवारी शहर युवक कॉंग्रेस व काँग्रेसच्या जिल्हा युवक पदाधिकाऱ्यांची बैठक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहावर  पार पडली.

या बैठकीला युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, राज्य सचिव योगेश काळे, राहुल ओगले, ग्रामीणचे प्रभारी सुनील नागरगोजे, शहरचे प्रभारी दिनेश चोथवे, सहसचिव सोमनाथ पाबळे, महासचिव दीपाली ससाणे आदी उपस्थित होते.

या बैठकीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी युवक कॉंग्रेसने मला विचारून कार्यक्रम घेतला असता तर आणखी मोठा कार्यक्रम घेता आला असता असे किरण काळे म्हणताच कार्यकर्ते संतप्त झाले. सर्वांनी एक होत काळे यांना बैठकीतून बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काळे बैठकीतून निघून गेले.

युवकच्या कार्यकर्त्यांनी किरण काळे यांना हाकलून लावले याची जिल्हाभर चर्चा सुरु होती. काळे यांच्या विरोधकांनी  या घटनेची जिल्हाभर चर्चा घडवून आणली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post