अल्पवयीन मुलीचा विनयभंग....

नगर : घरात घुसून अल्पवयीन मुलीस उचलून घराबाहेर नेऊन तिच्याशी अश्लिल कृत्य करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी अल्पवयीन मुलीची आई सोडवण्याकरिता आली असता तिला जातीयवादी शिवीगाळ केल्याची घटना सावेडी परिसरातील पाईपलाईन परिसरात घडली.


अल्पवयीन मुलगी तिची आई व लहान बहिणीसह घरात झोपलेले असताना अल्पवयीन मुलीच्या आईचा मित्र आसाराम भानुदास गवारे ( हल्ली रा-माळीवाडा, अ.नगर मूळ रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर जि.अ.नगर ) हा त्यांच्या घराचा दरवाजा उघडून आत आला. 

त्याने अल्पवयीन मुलीस त्याचे मिठीत उचलून घेतले.  घराबाहेर घेवून जावून त्याचे मिठीत घट्ट पकडले. तिला  लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यावेळेस अल्पवयीन मुलीच्या आईने घराचे बाहेर येवून अल्पवयीन मुलीस त्याचे तावडीतून सोडवून त्यास समाजावून सांगत असताना संबंधित युवकाने जातिवाचक शब्द वापरून त्यांच्या भावना दुखवून शिवीगाळ करून  तेथून पळ काढला. जाताना जीवे मारण्याची धमकी दिली. 

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पिडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आसाराम भानुदास गवारे ( हल्ली रा-माळीवाडा, अ.नगर मूळ रा. अशोकनगर, ता श्रीरामपूर अ.नगर ) याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post