अमर छत्तीसे
श्रीगोंदा : आढळगाव {श्रीगोंदे} येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज यात्रेनिमित्त मंदिर परिसरात हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात असल्याची माहिती सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी दिली.
आढळगावचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेला असते यावर्षी सहा एप्रिलला यात्रा उत्सव आहे. या यात्रेनिमित्त नवसपूर्ती म्हणून आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे हे स्वखर्चाने मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत.


Post a Comment