दोन तास काम उर्वरीत वेळेत घरगुती काम...

नगर : समाज माध्यमावर रोज नवीन अपडेट येत असतात. त्यात सध्या गेल्या काही दिवसांपासून एका संदेशाने धुमाकूळ घातला आहे. दोन तास काम व उर्वरीत वेळ घरातील काम हा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


या संदेशाची आता शासकीय कार्यालयासह खासगी कार्यालयातील वरिष्ठांनी दखल घेऊन कार्यालयीन वेळेत खासगी कामे करत फिरणार्यांचा शोध त्यांचा बंदोबस्त गरजेचे आहे.

सरकारी काम अन् बारा महिने थांब ही म्हण प्रचलित होती. परंतु कालमानपरत्वे या म्हणीत आता बदल झालेला आहे. कर्मचार्यांना दोनच तास काम अन् बाकीचा वेळ आराम असतो. त्यामुळे कर्मचार्यांना दोन तास कामाच्या वेळेतच ते भेटत असतात. त्यातच सर्वसामान्यांची कामे होत आहे. 

अशा आराम करणार्या कर्मचार्यांमुळे कार्यालयातील नियमित कामे करणारेही आराम करू लागले आहे. तर काहीजण कामचुकारपणा करू लागले आहे. काहींनी कार्यालयीन वेळेतच आता आपली कामे सुरु केलेली आहे. नित्यनियमाप्रमाणे ते खासगी कामे करीत असतात. 

विशेष म्हणजे हे करताना संबंधित वरिष्ठांची कामे करून त्यांचे लक्ष विचलीत करून टाकतात. ही परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शासकीयसह खासगी कार्यालयांची आहे.

या परिस्थितीमुळे अनेक कार्यालयातील कामे ठप्प झालेली आहे. एकाची सवय दुसर्याला लागली आहे. त्यामुळे फाईलचे ढिगारे साठू लागलेले असून आराम करणार्यांची कामे इतरांना दिली जात आहे. त्यामुळे कार्यालयांमध्ये वादावादीचे प्रसंग घडू लागलेेले आहेत. 

आराम करणारे बहाद्दर मात्र वरिष्ठांची कामे करत असल्यामुळे त्यांच्या आरामाची सोयबिनदीक्त होत आहे. आरडाओरड करणार्यांवर अतिरिक्त भार टाकला जात असून काहींना इतर कामे सोपविली जात आहे. 

असे प्रकार सध्या काही सरकारी-निमसरकारी कार्यालयासह खासगी कार्यालयांमध्ये सर्रास सुरु आहे. यामुळे अनेक कार्यालयात सध्या कर्मचार्यांमध्ये वादावादी सुरु असल्याची चर्चा होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post