चांदा : नेवासा तालुक्यातील विज वितरण कंपनीच्या घोडेगाव उपविभागाने सर्वोच्च कामगिरी करत नाशिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवत तालुक्यासह जिल्ह्यात भरारी घेतली आहे. घोडगाव विभागाच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी अथक परीश्रम घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा आज घोडेगाव उपविभागाने भव्य सन्मान सोहळा करून गौरविण्यात आले.
सन २०२२-२३ मध्ये घोडेगाव उपविभागने वीजबिल वसुलीमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्व उपविभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा गुणगौरव कार्यक्रम आज घेण्यात आला. यामध्ये सर्व कक्ष अभियंते, उपविभागातील सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, बिलिंग विभाग , मानव संसाधन विभाग, जनमित्र, बाह्यस्त्रोत कर्मचारी, यंत्रचालक या सर्वांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोडेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे, प्रमुख पाहुणे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे ,अहमदनगर ग्रामीण विभाग], अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पाटील, धाडगे, सरोदे, खताळ, किरपेकर, पिंपळगावकर, मराठे, श्रीमती शिंदे, श्रीमती सोनवणे, बोंडे, गावित आदींसह कर्मचारी वर्ग मोठ्या उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून बोलताना अभियंता बडे म्हणाले की, सन २०२२-२३ मध्ये घोडेगाव उपविभागाने वीजबिल वसूलीमध्ये नाशिक परिमंडळांतर्गत द्वितीय क्रमांक पटकवला आहे. या ऐतिहासीक यशामध्ये या उपविभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांचे अथक परीश्रमामुळे हे शक्य झाले आहे .
घरगुती, व्यावसायीक, औद्यागिक व सार्वजनिक सेवा ग्राहकांची वीजबिल वसूली पुर्ण करून अनमोल योगदान सर्वांनी दिले आहे त्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि सन्मान करणे आवश्यक होते . घोडेगाव विभागाचे हे सांघिक यश आहे .
भविष्यातही असेच प्रगती करुन कोकण परिमंडळ मध्ये नंबर येनेसाठी आपण सर्वांनी असेच एकजुटीने काम करू असे ते म्हणाले.


Post a Comment