विखेंची फौज राष्ट्रवादीच्या गोटात...खासदार डॉ सुजय विखेंच्या गाडीत बसणारे बसले जगतापांच्या गाडीत....

 अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची युती झाली असताना खासदार डॉ सुजय विखे यांची यंत्रणा राष्ट्रवादी च्या पाठीशी असल्याचे समजते.


कारण खा. विखेंच्या दौर्यात नेहमी बरोबर असणारे या निवडणुकीत राष्ट्रवादी चे माजी आमदार राहुल जगताप यांच्या गोटात गेले असल्यामुळे आमदार बबनराव पाचपुते यांचा गट आगामी निवडणुकीत खा. विखे यांच्या विरोधात भुमिका घेण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. विशेषतः पुर्व भागातील कार्यकर्ते विखे गटाचा करेक्ट कार्यक्रम करतील असे दिसते. 

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक प्रक्रिया चालू असुन या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे गट एकत्र आले असून विरोधात माजी आमदार  राहुल जगताप यांनी पॅनल उभा केला आहे. 

पण यात विखेंनी फिरत्या खुर्ची ची उपमा दिलेले आण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा हे जगताप यांना साथ देत असतानाच पुर्व भागातील विखे समर्थक एका गावचा पदाधिकारी ही जगताप यांच्या गोटात सामिल झाला आहे.

हा पदाधिकारी खा. विखे हे तालुक्यात दौरा करताना त्यांच्या गाडीत असतो व मीच खासदार यांच्या जवळचा आहे. असे भासवतो पण या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांना विरोध म्हणून संबंधित पदाधिकारी राहुल जगताप यांना साथ देत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

असे असले तर आगामी काळात आमदार बबनराव पाचपुते यांना मानणारा गट खा. विखे यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा मानसिकतेत आहे. त्यामुळे पूर्व भागातील त्या ग्रामपंचायत पदाधिकार्याला "माऊली" ने तर छुपे पाठबळ दिले नसेल ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post