स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ....

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेले आहेत. पुढील सुनावणी 4 मार्चला होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तारीख पे तारीख चा सिलसिला सुरू आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 4 मेला होणार आहे. कालसुद्धा सुनावणी न होता प्रकरण लांबणीवर पडलेलं होतं. निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वाढली आहे.

सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे सुरु आहे आणि आता पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. 4 मेला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुनावणी झाली. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात अडकल्यात दोन कारणांमुळे एकतर ओबीसी आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला पण आधी जाहीर झालेल्या 92 नगर परिषदांमध्येही हे आरक्षण मिळावे यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेले. सोबतच मविआच्या काळातली वॉर्डरचना 4 ऑगस्टला एका अध्यादेशाने या सरकारन बदलली. 22 ऑगस्टला सुप्रिम कोर्टाने जैसे थे आदेश दिला. त्यानंतर आत्तापर्यंत या प्रकरणाची सुनावणीच होऊ शकलेली नाही.

सुप्रीम कोर्टाने मविआ सरकारची वॉर्डरचना मान्य केली तर कदाचित निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल. पण 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. 

निवडणूक आयोग त्या दोन टप्प्यांत घेऊ शकते, काही पावसाळ्याआधी व काही पावसानंतर. दुसरी शक्यता म्हणजे जर शिंदे सरकारची वॉर्डरचना कोर्टाने मान्य केली तर मग नव्याने प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगाला काही काळ लागेल. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. मुंबई- पुण्यासारख्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post