नगर : चक्रधर स्वामी प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक आदेश शिरोळे यांची केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत अहमदनगर महानगरपालिका स्वच्छता उपक्रमात स्वछतामित्र म्हणून निवड करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान 2.0 मध्ये आपल्या अहमदनगर शहराने अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे.
चक्रधर स्वामी शाळेतील लेझीम व झांझ पथकातील विद्यार्थ्यांनी शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या भोवती स्वछता रॅलीचे आयोजन केले. या रॅलीमध्ये एकूण 30 विद्यार्थी सहभागी झाले होते.
नागरिकांचा सहभाग वाढून प्रबोधन व्हावे म्हणून राष्ट्रीय स्वच्छता प्रतिज्ञा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर रोहिनीशेंडगे यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले.

Post a Comment