शिर्डी :शिर्डीतील श्रीरामनवमी यात्रेतील रहाट पाळणा तुटून झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
साईसंस्थानच्या प्रसादालयासमोरील जागेत पाळणे लावण्यात आलेले आहेत. यातील एक खालीवर येणाऱ्या ट्रॉलीचा पाळणा अचानक तुटला. त्यामुळे पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले तर काहीजण पाळण्यात बसण्यासाठी बाजुला उभे होते.
त्यांच्यावर हे पाळणे आदळल्याने जखमी झाले. या दुर्घटनेत ज्योती किशोर साळवे {वय-45}, किशोर पोपट साळवे {वय 50} यांच्या पायांना मोठी गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय भूमी अंबादास साळवे {वय-14} हिला डोक्याला जखम झाली आहे. तसेच प्रविण अल्हाट {वय-45} हे देखील जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर काही काळ वातावरणात घबराट निर्माण झाली. यात्रेकरूंची पळापळ झाली. मात्र काही वेळात परिस्थिती जैसे थे झाली.

Post a Comment