अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील १९९६च्या दहावी च्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आवश्यक असणारा टिव्ही संच भेट दिला आहे.
१९९६च्या बॅच मधील विद्यार्थी एकत्र आले होते. यानिमित्ताने शाळेसाठी आवश्यक असणारे टिव्ही संच भेट दिला आहे.
यावेळी माजी सैनिक तथा सेवा सोसायटी संचालक संतोष धोत्रे, ज्ञानेश्वर डाळिंबे, राजू छत्तीसे, वर्षा शिंदे (कोल्हे).कैलास भैलुमे, शरद गव्हाणे तसेच प्राचार्य सुरेश साळुंखे, विलास शेळके सर, बापुराव काळे सर उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण शिकलेल्या शाळेसाठी काहीतरी देणे लागत आहोत. या भावनेतून शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल युगात मदत व्हावी म्हणून टिव्ही संच भेट दिला असल्याचे माजी सैनिक तथा सेवा सोसायटीचे संचालक संतोष धोत्रे यांनी सांगितले.

Post a Comment