श्रीगोंदा : कोरोना काळातही ५० हजारांची औषधे देऊन रुग्णसेवेचा जागर केला होता. त्यात भूमिपुत्राने आता पुन्हा मदतीसाठी हात पुढे केलेला आहे. यावेळीच्या मदतीने आरोग्य केंद्र प्रकाशमान झाले आहे.
आढळगावचे (ता. श्रीगोंदा) भूमिपुत्र व पुण्यातील उद्योजक आनंद शंकर जगदाळे यांनी आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला एक लाख रुपयांचे इन्व्हर्टर व चार बॅटऱ्या भेट देऊन दिल्या आहेत.
आनंद जगदाळे यांनी १९९५ ला भारती विद्यापीठमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता पुण्यात 'प्लेन्ट' नावाने सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. या कंपनीचे जपान, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया आदी देशांत काम चालते. ते व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झाले असले तरी आपल्या कर्मभूमीच्या सामाजिक कामात योगदान देतात.
आनंद जगदाळे यांनी बॅटऱ्या, इन्व्हर्टर हे डॉ. नितीन खामकर यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केले. यावेळी माजी सरपंच सुभाष गांधी, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, सरपंच शिवप्रसाद उबाळे, घोडेगावचे सरपंच रामदास घोडके, सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब गव्हाणे, मनोहर शिंदे, मधुकर गिरमकर, हनुमंत डोके, नितीन गव्हाणे आदी उपस्थित होते. स्थायिक झाले असले तरी आपल्या कर्मभूमीच्या सामाजिक कामात योगदान देतात.
आनंद जगदाळे यांनी बॅटऱ्या, इन्व्हर्टर हे डॉ. नितीन खामकर यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केले. यावेळी माजी सरपंच सुभाष गांधी, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, सरपंच शिवप्रसाद उबाळे, घोडेगावचे सरपंच रामदास घोडके, सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब गव्हाणे, मनोहर शिंदे, मधुकर गिरमकर, हनुमंत डोके, नितीन गव्हाणे आदी उपस्थित होते.

Post a Comment