नगर: शिकवणीवरून पायी घरी जात असलेल्या तरुणीची रस्त्यात छेड काढून भावाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. पाच) पावणेतीन वाजेच्या सुमारास तारकपूर येथील झुलाल चौकात घडली.
तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिकवणी संपून तरुणी पायी घरी जात होती. तिला पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तुझा मोबाइल नंबर देण्याची मागणी केली.
.त्यावर तरुणीने मी तुम्हाला ओळखत नाही, नंबर देणार नाही, असे सांगितले. परंतु, तरीही मोटारसायकलवरून आलेले दोघे तरुणीचा पाठलाग करतच होते. त्यामुळे तरुणीने तिच्या भावाला फोन करून बोलावून घेतले. भावाला आरोपींनी दगडाने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment