राहुरी: तुम्ही आमच्या नादी कशाला लागता, नाही तर तुम्हाला मारावेच लागेल, असे म्हणून अकरा जणांनी एका महिलेला शिवीगाळ करत, मारहाण केल्याची घटना पाथरे खुर्द येथे घडली.
सुरेखा पांडुरंग पठारे (वय ४५) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पठारे या रस्त्याने जात असताना, महेश रावसाहेब पठारे यांच्याबरोबर शाब्दिक बाचाबाची झाली. याच दरम्यान, तेथे इतर आरोपी आले व तुम्ही कायम आमच्या नादी लागता, असे म्हणून त्यांनी सुरेखा पठारे यांना मारहाण केली. या पठारे यांच्या गळ्यातील पोत व कानातील फुले तुटून गहाळ झाले.
आरोपी महेश पठारे त्याच्यासोबत असणारे विलास आनंदा पठारे, वैभव विलास पठारे, अर्चना विलास पठारे, अमोल रावसाहेब पठारे, सुनीता रावसाहेब पठारे, सुनील अंतोन पठारे, सुवर्णा सुनील पठारे, किरण अगुस्तिन पठारे, बाळासाहेब अगुस्तिन पठारे, नंदा अगुस्तिन पठारे (सर्व रा.पाथरे खु.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment