कर्जत बाजार समितीच्या हा निकाल

कर्जत : कर्जत बाजार समितीच्या18 जागांपैकी रोहित पवार गटाला नऊ जागा मिळाल्या आहेत तर राम शिंदे गटाला नऊ जागा मिळाली आहे. त्यामुळेबाजार समितीचे सभापतीपदी कोणाची वर्णी  लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कर्जत बाजार समितीच्या दोन जागांसाठी आज फेर मतमोजणी होत आहे. या फेर  मोजणी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या फेर मतमोजणी मध्ये आमदारगटाला जर दोन जागा मिळाल्या तर राम शिंदे गटाचा सभापती होणार आहे. 

परिस्थिती जैसे थे राहिली तर ईश्वरी चिठ्ठीने सभापती निवडला जाणार आहे. यामध्ये कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले. जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदी राम शिंदे शिंदे गटाला संधी मिळाली आहे. 


कर्जत बाजार समिती निवडणुकीत ईश्वरी चिठ्ठी आमदार रोहित पवार यांच्या गटाला मिळण्याची शक्यता सध्या तालुक्यात सुरू आहे. 

आज होणाऱ्या फेर मतमोजणीत काय निकाल लागतो यावर आगामी राजकीय डावपेच होणार आहे. तूर्त फक्तचर्चा सुरू आहे. ठोस असा कुठलाही निर्णय नाही

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post