कुकडीचे आवर्तन सोडण्यास जाणून बुजून विलंब... दोन दिवसात आवर्तन सुटले नाही तर उपोषण

 अमर छत्तीसे

श्रीगोंदा : सध्या उन्हाची भयंकर तीव्रता वाढली असून पाणी पातळी खालावली असल्याने कुकडीचे आवर्तन तातडीने सोडणे गरजेचे होते पण आवर्तनास अधिकारी जाणून बुजून विलंब करत आहेत  त्यामुळे दोन दिवसात पाणी सुटले नाही तर सिंचन भवनासमोर उपोषण करणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.


सध्याच्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे पाणी पातळीत घट झाली असून  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर होऊ लागला असल्यामुळे कुकडीतुन तातडीने आवर्तन सोडणे गरजेचे आहे. 

यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २२मे पासून आवर्तन सोडण्याबाबत आदेश दिले असताना कुकडीचे वरिष्ठ अधिकारी कोणाच्या तरी दबावामुळे आवर्तन सोडण्यास जाणून बुजून विलंब करत आहेत. 

त्यामुळे जर दोन दिवसात आवर्तन सोडले नाही तर  सिंचन भवन पुणे येथे उपोषण करणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post