चांदा : विक्री झालेल्या कांद्याला जाचक अटी घालून प्रति क्विंटल 350 रु अनुदान जाहीर केले. परंतु आजपर्यत शेतकऱ्यांना एक रुपयाही अनुदान देण्यात आले नाही. अगोदरच शेतकरी अवकाळी पाऊसाने अडचणीत सापडला आहे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे जर शेतकऱ्यावर असाच अन्याय चालू राहिला तर अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल, असे प्रतिपादन आमदार शंकरराव गडाख यांनी केले.
माका येथील सुमारे पाच कोटीच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शासनाने विक्री झालेल्या कांद्याला जाचक अटी घालून प्रति क्विंटल 350 रु अनुदान जाहीर केले परंतु आजपर्यत शेतकऱ्यांना एक रुपयाही अनुदान देण्यात आले नाही.अवकाळी पावसाने शेतकरी पुरता अडचणीत सापडला असतांना खऱ्या मदतीची गरज असतांना देखील शासनाने केवळ मदतीची घोषणा केली आहे.
सदर घोषणेची तातडीने अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे व अनुदान देतांना घातलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात. तसेच संपूर्ण नेवासा तालुक्यातील गावा गावात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली होती जाने महिन्यापर्यत अनेक गावातील शेतात पाणीच पाणी होतेतरीही सापत्न वागणूक देऊन नेवासा तालुक्यातील 5 मंडले अतिवृष्टी मधून संतधार पाऊस दाखवून वगळण्यात आले आहे.
अतिवृष्टी अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेल्या नेवासा तालुक्यातील 5 ही मंडलांनी अतिवृष्टी अनुदान देऊन शेतकऱ्यांना शासनाने आधार द्यावा अशी मागणी गडाख यांनी केली.
बाजार समितीच्या निवडणुकीत आ गडाख यांनी तालुक्यातील सहा गावात दोन्ही गटातील वाद मिटवून गावाच्या विकासासाठी एकत्र आणले याची नेवासा तालुक्यात मोठी चर्चा होत आहे .


Post a Comment