चांदा : नेवासा तालुक्यातील स्थानिक विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या तरी विकास कामाबाबत आपण कधीही मागे हटणार नसून कोट्यवधीच्या कामाला जी स्थगिती मिळाली आहे. ती लवकरच सुटेल, असे आमदार शंकरराव गडाख यांनी माका येथील कार्यक्रमात बोलतांना सांगितले .
माका (ता. नेवासा) येथे आ शंकरराव गडाख यांच्या हस्ते 5 कोटी 57 लक्ष रु खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 3 कोटी 50 लक्ष रु खर्चाची पाणी योजना, पशुवैद्यकिय दवाखाना इमारत बांधकाम करणे 30 लक्ष रु, माजी खासदार यशवंतराव गडाख शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारत 1 कोटी 65 लक्ष रु, महादेव मंदिर सभामंडप बांधकाम करणे 7 लक्ष रु, बाबीर बाबा (खेमनर वस्ती) सभामंडप बांधकाम करणे 5 लक्ष रु, या कामांचा समावेश आहे.
आ शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक माका गावातील सर्वसमावेशक कामे मार्गी लावल्याबद्दल आ गडाख यांचा माका ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना आ. शंकरराव गडाख म्हणाले सार्वजनिक कामे तसेच व्यक्तिगत प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे
माका येथे एकाच वेळी 5 कोटी 67 लक्ष रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे.मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीमुळे ही कामे आपण पूर्ण करू शकलो. तालुक्यातील अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे.
याविरोधात आपण हायकोर्टात गेलो आहोत सदर कामे सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. नव्याने सुरू करण्यात आलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आ गडाख यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी माका गावचे सरपंच,उपसरपंच सर्व ग्राम. प सदस्य,सोसा .चेअरमन,व्हा चेअरमन संचालक आदींसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी माका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment