राहुरी : शिर्डीतील एका प्रकरणात राहुरीतील प्रतिष्ठित महिलेला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणावरून राहुरी शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. ती महिला कोण असा सवाल केला जात आहे.
या प्रकरणामुळे राहुरी शहर व तालुक्यात सलग दुसर्या दिवशीही चर्चा सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा अशी मागणी होत आहे.
सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या त्या महिलेला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा गुन्हा दाखल होण्याअगोदर अनेक सामाजिक कार्यक्रमाला या महिलेने हजेरी लावली आहे. यावेळी अनेक महिलांनी संबंधित महिलेबरोबर छायाचित्र काढून ते समाज माध्यमावर व्हायरल केलेले आहे.
परंतु आता संबंधित महिला गुन्ह्यात अडकल्याने काही महिलांनी तर महिलेबरोबर छायाचित्र समाज माध्यमावरून हटवले आहेत. नको ती झंजट म्हणून अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून फोटो हटवण्यात सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गंभीर असल्याची चर्चा राहुरी शहर व तालुक्यात सुरू झालेली आहे.

Post a Comment