पत्रकारितेतील अवलिया...

दत्ताजी बबनराव उनवणे निघोज येथे राहतात. ते १९८५ पासुन पत्रकारीता करतात. दैनिक लोकमत, दैनिक लोकसत्ता, दैनिक सार्वमत, दैनिक पुढारी, दैनिक देशदुत,  दैनिक समाचार, दैनिक गावकरी, दैनिक अजिंक्य भारत, दैनिक पुण्यनगरी, दैनिक नगर सह्याद्री, दैनिक राष्ट्र सह्याद्री, दैनिक समर्थ भारत, दैनिक पारनेर दर्शन या लोकप्रिय वृत्तपत्रातून पत्रकारीता करताना समाजाभिमुख कामांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. 


गेली आठ वर्षांपासून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन माध्यमातून लोकसहभागातून प्रत्येक दिवाळीला शेकडो सदस्य व पदाधिकारी माध्यमातून गरीबांची दिवाळी हा उपक्रम साजरा करुण हजारो गरीब घटकांना साडी व फराळ वाटप केले.

आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठान माध्यमातून शिवजयंती, संभाजीमहाराज जयंती उत्सव साजरा होत असतो. देवांग कोष्टी समाज सेवा मंडळाची स्थापना करण्यात पुढाकार तसेच समाजाला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून साधारण दोन वर्षात समाजाचा  सभामंडप खासदार आमदार निधी माध्यमातून उभा करण्याचा संकल्प आहे. 

सामाजिक कामांची आवड असल्याने लोकसंपर्क मोठा आहे. श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेत पाच वर्षे संस्थापक संचालक होण्याची संधी मिळाली. ग्रामपंचायत मध्ये वयाच्या तीसाव्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. 


पत्रकारितेच्या माध्यमातून समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने होत असल्याने जवळपास दिड लाख लोकवस्ती असणाऱ्या निघोज जिल्हा परिषद गट कान्हूर जिल्हा परिषद गटांमध्ये पत्रकारीता माध्यमातून सातत्याने संपर्क आहे. 

राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, आमदार निलेश लंके साहेब यांच्याशी थेट संपर्क असल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी फार मोठी मदत होत असते. 

पत्नी मंदा उत्तम गृहिणी आहे. संसारात पाठबळ देण्याचे काम झाल्याने आनंदी आनंद आहे. दोन मुले मोठा मुलगा राहुल हा जी एस महानगर बॅंकेत मुलुंड शाखेत अधिकारी पदावर काम करीत असून अंबरनाथ येथे स्वतःचा फ्लॅट आहे. दुसरा मुलगा रोहन हा निघोज येथील मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टमध्ये उपव्यवस्थापक पदावर कार्यरत आहे.  

प्राजक्ता राहुल उनवणे व सरला रोहन उनवणे या सुना आहेत. प्राजक्ता ही गृहीणी आहे. सरला ही स्वरांजली केक्स या नावाने शॉप आहे. तीन नाती व एक नातु आहे. मोबाईल नंबर ९०९६२७६६८७ आहे.

आपल्या समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ताजी उनवणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आनंददायी आयुष्यासाठी शुभेच्छा.

- शुभेच्छुक समस्त पोंदे परिवार, अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post