मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ होणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या सहा हजार रुपयांचा वेतन आहे. ते थेट 16 हजार रुपये करण्यात आले आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी, अशी अनेकदा मागणी झालेली होती.
मात्र सरकारने थेट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment