नगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यासअवधी असला तरी श्रीगोंदा तालुक्यात आतापासूनच निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही मिळणार याची चाचणी काहींनी केलेली आहे.
उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच काहींनी इतर पक्षांशी संपर्क वाढविला आहे. राष्ट्रवादीतच अंतर्गत कुरघोड्या सुरू झालेल्या आहेत. याचा फायदा भाजपाला होणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. त्यातच पक्षाने काहींना जवळीक दिलेली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली आहे. काहींनी पक्षाच्या कार्यक्रमांना पासून अलिप्त राहणे पसंत केलेले आहे.
पक्षांतर्गत सुरू असलेल्या हेवेदाव्यांमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. काही कार्यकर्ते तर विरोधी गटात दाखल झालेले आहेत. या सर्व प्रकारांना स्थानिक नेते जबाबदार आहेत.
मागील दोन-तीन वर्षांपूर्वी काहींनी पक्ष विरोधी कामे केलेले आहेत अशांना जाता पक्ष उमेदवारी देण्याच्या हालचालीकरून संकेत देत आहे. इतर नेते मंडळी नाराज झालेली आहे.
विशेष म्हणजे काहींनी पक्षविरोधी काही निवडणुकांमध्ये कामही केलेले आहे. असे असतानाही त्यांच्यावरच विश्वास टाकत असल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढलेली आहे. ही नाराजी अगं मी आगामी काळात डोकेदुखी ठरणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ही बाब खरी असली तरी काही नेतेमंडळी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी आता पक्षावर दबाव तंत्राचा वापर करू लागले आहे.
आमचा विचार करा नाहीतर आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ काहींनी हालचाली केलेला आहे यावरकार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनीच श्रीगोंदा सुरू असलेल्या घडामोडींवर लक्ष घालूनयोग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षाव्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सुरू असलेला वाद कायमच सुरू राहावा भाजप नेते मंडळी प्रयत्न करीत आहे.
Post a Comment