अमर छत्तीसे
श्रीगोंदा : मरेपर्यंत आपण राष्ट्रवादीमध्येच राहणार आहोत. अशी घोषणा करणारे घनश्याम शेलार अचानक बदलेले आहे. ते फक्त बदलले नाही तर त्यांनी थेट पक्ष बदलही केलेला आहे. त्यांच्या या निर्णयाची सध्या तालुक्यात वादळी चर्चा सुरू झाली आहे. अंतर्गत संघर्ष होता तर संबंधिताने पुन्हा जनतेला घरी घेऊन जाणे गरजेचे होते.
राष्ट्रवादी काँग्रेस व घनश्याम शेलार हे समीकरण असताना शेलारांना यांना नेमके खटकले काय असे काय घडले त्यांना पक्षाला सोडचिठ्ठी द्यायची वेळ का आली? कोणामुळे पक्ष बदलावा लागला , असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस ने २०१९ मध्ये शेलार यांना पुर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरवले होते. स्वत: शरद पवार यांनी श्रीगोंद्यात विशेष लक्ष घातले होते. पवारांचे अतिशय विश्वास म्हणून शेलारांची पक्षात ओळख होती. त्यामुळे कार्यकर्तयांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
मध्यंतरी झालेल्या पक्षाच्या बैठकीत शेलार यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पक्ष निरीक्ष अंकुश काकडे यांनी केली होती.
पक्षात वजन असताना नेमके बिनसले कुठे हाच प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. मरेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार अशी घोषणा होत.
अजित पवार यांचे विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी घनश्याम शेलार यांनी बीआरएस'चे प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची हैदराबाद येथे पक्ष प्रवेशासंबधी भेट घेतली होती. त्या अनुशंगाने शेलार यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करून केलेला आहे.
घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी सोडून मोठी चूक केली आहे. त्यांनी हा निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊनच घ्यायला हवा होता. परंतु त्यांनी जवळील काही लोकांना सांगून घेतलेला आहे. हा त्यांचा अंदाज चुकीचा ठरणार आहे. त्यामुळे शेलार यांना येणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू झाली आहे.
Post a Comment