अमर छत्तीसे
श्रीगोंदा : राज्यात गाजत असणाऱ्या जल जीवन योजनेमुळे गावोगावी पदाधिकार्यांमध्ये वाद सुरु झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात जल जीवन योजनेच्या कामाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी उद्घाटन केले.
त्या भागाचे खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रण नसल्याने त्यांनी लोकसभेत कार्यक्रम करते, असा इशारा दिला. पण नगर दक्षिणमध्ये कोट्यवधीची कामे विना उद्घाटन चालू असताना या भागाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील हे या योजनेबाबत ब्र शब्द काढत नाहीत हे विशेष...
सध्या राज्यभर जल जीवन मिशन योजने अंतर्गत " हर घर जल" यासाठी कोट्यावधीच्या योजना आल्या आहेत. यातील बहुतांश कामे उद्घाटन न करता पूर्णत्वाकडे चालू आहेत. पण तालुक्यातील एक दोन कामांचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत झाले.
काही मोठ्या गावातील कामे पूर्ण होत आली असतानाही ना उद्घाटन ना भूमिपूजन असेच चालू आहेत. त्यामुळे इतर कामांच्या उद्घाटन पत्रिकेत नाव नाही अथवा कोणसिलेवर प्रोटोकॉल पाळला जात नाही म्हणून हक्कभंग दाखल करणारे गप्प का असा सवाल उपस्थित होत आहे.
एकिकडे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यात उद्घाटनाला बोलवले नाही म्हणून त्यांनी थेट केंद्रीय राज्य मंत्र्यांना इशारा दिला पण नगर दक्षिणचे खासदार या योजनेबाबत गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे.
श्रीगोंदा तालुक्यात पंचायत समितीमध्ये सध्या प्रभारी राज आहे. गटविकास अधिकारी प्रभारी व जल जीवन योजनेचा पदभार असणारे शाखा अभियंता ही प्रभारी त्याचबरोबर हेच प्रभारी शाखा अभियंता १५ दिवसात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांचे या योजनांवर विशेष लक्ष दिसत नाही.
फक्त कामाची पाहणी करणे म्हणजेच आपले कर्तव्य आहे असे नाही. ठेकेदार कोण यंत्रणा कोणती याचीही माहिती पहिजे. तसेच पाईप खरेदी साठी चालू कामाचे (R A) बीले वाटप केली आहेत पण संबंधित अधिकारी अशी प्रक्रिया नसल्याचे ठामपणे सांगत असल्यामुळे या प्रभारी अधिकार् याचा कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
जल जीवन योजनेच्या कामांसाठी कोट्यावधी चा निधी आला आहे बहुतांशी गावात कामे पूर्ण होत आली आहेत. पण कामे सुरू करा साहेबांना वेळ नाही. नंतर पाहू अशा सूचना प्रवरेच्या पगारी दुताकडून मिळाल्यामुळे कामे सुरू व अंतिम टप्प्यात आली आहेत. पण या दुतालाही आदेश असल्याशिवाय एवढे धाडस करू शकत नाहीत. या दुतावर पक्षीय मंडळी नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.
Post a Comment