राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या घरावर काळे फासले... गद्दार लिहून कार्यकर्त्यांनी लिहिले....

कर्जत : कर्जत येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला काळे फासण्यात आले. यामुळे राष्ट्रवादीतील गद्दारी उघड झाली आहे.


कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राम शिंदे यांच्या गटाचे 9 तर रोहित पवार यांच्या गटाचे 9 उमेदवार निवडून आले होते त्यातूनच सभापती उपसभापतीची निवड झाली. या निवडणुकीमध्ये दोन्ही जागा राम शिंदे यांच्या गटाला मिळाल्याने रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडी संदर्भात राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती राम शिंदे गटाचे निवडून आल्याने तो राग मनात धरून रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत कर्जत येथील राजेंद्र फाळके यांच्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहीत घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post