शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार याच बँकेतून व्हावे...

नगर  : जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, एक तारखेलाच शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. 


या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. तर अनेक शिक्षक, शिक्षकेतरांनी बँक, सोसायटीचे कर्ज काढले असून, वेळेवर पगार न झाल्यास हप्ता देखील भरला जात नाही, त्यामुळे नाहक व्याज व दंडाचा भुर्दंड बसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, रमजान हवालदार, राजेंद्र लांडे, महेंद्र हिंगे, बाळासाहेब निवडुंगे, नंदकुमार शितोळे, देवीदास पालवे, वैभव सांगळे, उध्दव गायकवाड, राहुल झावरे, भिमराव खोसे, प्रशांत म्हस्के, संजय देशमाने, सोमनाथ सुंबे, सुधीर काळे, उल्हास देव्हार, रविंद्र गावडे, रामराव काळे, सुधाकर काळे, कुंडलिक वैरागर, वसंत दरेकर आदी उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच राष्ट्रीयकृत बँकेत जमा होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अनेक वेळा निवेदन, तोंडी चर्चा तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त यांच्या बैठकीत सुद्धा हा प्रश्‍न संघटनेच्या वतीने मांडण्यात आला.

परंतु केवल शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे काही शिक्षक, शिक्षिकेतरांचे पगार 12 जून रोजी पर्यंत झालेले नाही. काही विद्यालयांचे पगार बाकी आहेत, काही विद्यालयामध्ये पगार हे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त खात्यावर न जाता इतर संस्थेच्या खात्यावर जमा झालेले आहेत. 

संबंधित प्रकार अत्यंत चुकीचा असून, त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला राष्ट्रीयकृत बँकेत पगार करण्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अनेक फरक बिला संदर्भात वेळोवेळी कार्यालयाशी संपर्क साधला तरी, देखील सातव्या वेतन आयोग फरक बिले व इतर देयक शिक्षक, शिक्षकेतरांना प्राप्त झालेले नाही. सदर जिव्हाळ्याचा प्रश्‍न तातडीने सोडवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post