एसटीच्या चार कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

नेवासा ः राज्य परिवहन महामंडळाच्या नेवासे आगारातील चार कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा एसटी प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला.


या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक रामनाथ मगर होते. या वेळी वासुदेव आव्हाड, राकेश सोनवणे, कैलास म्हस्के, रतन हरकल, रमेश आदिक, मयूरी हाडके, प्रसाद परदेशी आदी उपस्थित होते.

एसटीमध्ये प्रदीर्घ सेवेत असलेले रामभाऊ कराळे, सुभाष नवले, मच्छिंद्र गवळी, केशव साळुंके आदी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा आगार व्यवस्थापक रामनाथ मगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मान्यवरांनी चारही कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post