भेटीलागी जीवा लागलीसे आस... चांदा ते पंढरपूर दिंडीचे उदया प्रस्थान

चांदा : भेटी लागी जीवा लागलीसे आस | ,पाहे वाट रात्रंदिवस | पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांचे मन पंढरीकडे लागले आहे. कधी एकदा डोळे भरून विठुरायाला पाहिल अशी आस मनी घेऊन नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्रीकृष्णदास लोहिया महाराज दिंडी सोहळ्याचे प्रस्थान उद्या शुक्रवार दिनांक 16 रोजी होत आहे.


वै . गुरुवर्य ह भ प श्रीकृष्णदासजी लोहिया महाराज चांदा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे यंदाचे 23 वे वर्ष असून उद्या शुक्रवार दिनांक 16 पासून या दिंडी सोहळ्याला प्रारंभ होत आहे. गावातील मुख्य बाजारपेठेतील श्रीराम मंदिरात रामायणाचार्य हरिभक्त परायण पंडित महाराज भुतेकर यांच्या  मार्गदर्शनाखाली सर्व वारकरी एकत्र येणार असून त्या ठिकाणी विठुरायाचा जयघोष मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

तेथून  चांदा ते पंढरपूर दिंडी सोहळ्याला प्रारंभ होईल .दिंडी प्रस्थानावेळी तोफांची सलामी, हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा आवाज, सनई चौघडा, बॅड पथक अशा उत्साहात चांदा येथून दिंडीला सुरुवात होणार आहे .चांदा, घोडेगाव, शिंगवे तुकाई, वांजोळी फाटा, जेऊर बायजाबाई ,गजराज नगर अहमदनगर ,विठ्ठल मंदिर गाडळकर मळा अहमदनगर, मिलिटरी कॅम्प, शिराढोण ,दहिगाव साकत ,रुईछत्तीसी ,घोगरगाव, कंटेश्वर मंदिर थेरगाव, सिद्धेश्वर पेट्रोल पंप मिरजगाव, एग्रीकल्चर कॉलेज मिरजगाव, पाटेगाव, चापडगाव हायस्कूल ,जातेगाव ,मांगी, देवीचा माळ करमाळा, खडकेवाडी ,शेलगाव ,कंदर, टेंभुर्णी, वेणेगाव फाटा ,परिते ,करकंब मार्गे प्रवास करत दिंडी सोमवार दिनांक 26 रोजी पंढरपूर गोशाळा, हभप गणेश परचंडे भटूबंरे नागरिविश्व निवास पेट्रोल पंपा शेजारी पंढरपूर या ठिकाणी पोहचणार आहे. 

पंढरपूर येथे दिंडी चार दिवस मुक्कामी राहणार आहे . शुक्रवारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे दिंडी प्रदक्षिणा होऊन पंडित महाराज भुतेकर यांचे आषाढी एकादशीनिमित्ताने कीर्तन होणार आहे. शुक्रवार दिनांक ३० रोजी द्वादशीच्या दिवशी हरिभक्त परायण पंडित महाराज भुतेकर यांचे काल्याचे किर्तन होऊन दिंडी पंढरपूर कडून चांद्याकडे मार्गस्थ होणार आहे.

सदर दिंडीचे संपूर्ण नियोजन पुर्ण होत आले असून यंदा वाढती भाविकांची संख्या लक्षात घेता संयोजकाच्या वतीने योग्य ते नियोजन केले आहे .या दिंडी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन दिंडी सोहळा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

एक शिस्तबंद दिंडी मधून देवगड दिंडी नंतर श्रीकृष्णदास लोहिया महाराज दिंडीचे नामउल्लेख केला जातो.बळीराजाही शेतातील कामे उरकून दिंडीसाठी सज्ज झाला आहे .पावसाने उघडीप दिल्याने सर्व चिंता पाडूरंगाच्या चरणी ठेवत बळीराजा दिंडित सहभागी होत असतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post