आजोळीचा सन्मान देशसेवेला बळ देणारा... असिस्टंट कमांडंट प्रेषित काळेचा चांद्यात नागरी सन्मान...

चांदा : आजोळ हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे असते . आज आजोळातील सर्व गावकऱ्यांनी एकत्रीत येत माझा सन्मान केला. त्यापासून मला देशसेवेसाठी आणखी  उर्जा मिळाली. त्यामुळे हा सन्मान माझ्यासाठी सर्वोच्च आहे, असे प्रतिपादन पोलिस सेवेत असिस्टंट कमांडर म्हणून नवनियुक्त झालेल्या प्रेषित रमेश काळे यांनी केले आहे.


नाशिकचे उपायुक्त रमेश काळे यांचे चिरंजीव प्रेषित काळे यांची नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकारच्या सेंट्रल आर्म पोलिस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली आहे . त्यांचाआज नेवासा तालुक्यातील चांदा येथील चौधरी फार्म येथे भव्य नागरी सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्दक्षस्थानी ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवाशाचे माजी प्राचार्य गणपतराव चव्हाण होते. 


सुरुवातीला चांदा ग्रामपंचायत , सोमेश्वर पतसंस्था विविध संघटना , संस्था , युवक मंडळ यांनी प्रेषित काळे यांचा यथोचित सन्मान केला . पोलिस दलातील सर्वोच्च पदावर निवड होण्यासाठी प्रेषित काळे यांना आलेल्या अनंत अडचणी अडथळे त्यांनी सांगितल्या. सुरवातीपासूनच देशसेवेची आवड असलेल्या प्रेषित यांना लहानपणापासून काहीतरी वेगळे करण्याची अफाट महत्वाकांक्षा होती. 


त्यातच वडिल रमेश काळे प्रशासकीय सेवेतून करत असलेल्या समाजसेवेने प्रभावित होत. जिद्द् आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे ऐतिहासिक यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील मुले खूप हुशार असतात. त्यांनी अथक परीश्रम घेतल्यास त्यांनाही मोठा वाव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी, असेही ते म्हणाले.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य गणपत चव्हाण , माजी सभापती कारभारी जावळे , गावच्या सरपंच सुनंदाताई दहातोंडे , एस .बी. दहातोंडे , डॉ विनोद गुंदेचा , एकनाथ जावळे , आदिनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी प्रेषित काळे यांच्या मातोश्री सौ मिनाताई काळे / चौधरी , सौ कुसुम चौधरी ,तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी  , डॉ विकास दहातोंडे , भाजपाचे कैलास दहातोंडे , ज्ञानदेव दहातोंडे , चांगदेव दहातोंडे , सौ शुभदा चौधरी , सौ मुक्ताबाई दहातोंडे , अलका दहातोंडे , सुमन रासकर , प्रयगा चौधरी , बन्सी गायकवाड , अरुण दहातोंडे , रमेश थोरात , किरण जावळे, चांगदेव जावळे , आप्पासाहेब दहातोंडे , मच्छिंद्र दहातोंडे , सुभाष शिंदे, मच्छिंद्र चव्हाण , निवृत्ती भगत , संजय दहातोंडे, बाबासाहेब भालकेआदिसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते . सुत्रसंचालन माजी सभापती कारभारी जावळे यांनी तर आभार प्रदर्शन भेंडा कारखान्याचे माजी संचालक प्रदिपभाऊ चौधरी यांनी केले.

प्रेषित काळे यांचे वडील नाशिकचे उपायुक्त रमेश काळे हे चांदा येथील माजी सरपंच व भेडा कारखान्याचे माजी संचालक प्रदिपभाऊ चौधरी यांचे जावई आहेत . उपायुक्त रमेश काळे यांच्या पत्नी सौ मिनाताई काळे / चौधरी या चांदा गावच्या उच्चशिक्षित लेक असून त्यांनी आदर्श माता होत आपल्या कौशल्याच्या जोरावर मुलाला केंद्रीय गृहमंत्रालयातील थेट असिस्टंट कमांडंट पदापर्यंत नेले. तर मुलीला आतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपनीत मोठया पदापर्यंत मार्गदर्शन करत घडवले आहे .आदर्श माता तसेच गावची आदर्श लेक म्हणून सौ मिनाताई यांचाही यावेळी गावच्या वतीने सन्मान करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post