निघोज : महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांना थांबवण्याचे काम आपण केले असून पारनेरचा नेता आपल्यासाठी किरकोळ असून लोकांचे प्रश्न सोडवून आपण लोकसंग्रह जमा केला असून हीच जनता योग्यवेळी आपली साथ करणार असल्याची ग्वाही देत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सचिन वराळ पाटील यांच्या वाढदिवस कार्यक्रमात आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता जोरदार टीकाटिप्पणी केली.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व वराळ पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कार करण्यासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील आवर्जून आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सचिन पाटील वराळ यांचा वाढदिवस निमित्ताने तसेच खरेदी विक्री संघाच्या सर्व संचालकांचा यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्ताशेठ ( नाना) पवार, माजी सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे तालुका प्रमुख (शिंदे गट) विकास रोहकले, डॉ शिवाजीराव खिलारी, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखीले, युवा नेते संदीप सालके, मनसेचे नेते सतिष म्हस्के, कॅप्टन विठ्ठलराव वराळ, संपदा पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव वराळ, कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, डॉ. राहुल विखे पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य हसनापुर येथील ग्रामपंचायत सदस्य समीर शेख, भैय्या शेख, युवा नेते असदभाई पटेल, शाहरुख पठाण, शाहरुख शेख ,देखरेख संघाचे संचालक सतिष पिंपरकर, मधुकर पठारे, प्रमोद कावरे, बाजीराव आलभर, संग्राम पावडे, दत्तात्रय रोकडे, गंगाराम रोहकले,प्रसाद शितोळे, सुनिल पवार, रघुनाथ खिलारी, शैलेंद्र औटी, आण्णा शिंदे, भाऊसाहेब मेचे संचालिका ज्योती ठुबे,रेखा मते, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, सुनिल पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, निलेश घोडे, राजेश गोपाळे, खासदार डॉ सुजय विखे पाटील युवामंचचे प्रवक्ते प्रतिक वरखडे, सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील डी फार्मसी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आर के वराळ पाटील, मुंबई येथील व्यवसायीक राजूनाना वराळ, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ पाटील, रवि लंके, राहुल वराळ, पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बजरंग वराळ, सोसायटीच्या संचालिका मनिषा वराळ, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, आपले गाव गणपती समाजसेवी प्रतिष्ठान अध्यक्ष रवि रणसिंग, सचिव रोहित पठारे, मार्गदर्शक भास्करराव सोनवणे, यश लोढा , सचिन शिरवले, अमोल सालके आदी उपस्थित होते.
खासदार विखे पाटील म्हणाले कोणतीही निवडणूक आली की पारनेर तालुक्यातील विरोधक फक्त विखे यांनाच टार्गेट करतात एक आमदार दोन माजी आमदारांना घेउन निवडणूक लढवतो. ज्यांना माजी केले आहे. ते सुद्धा विद्यमान आमदारांच्या मांडीवर बसतात तिसरे माजी आमदार यांच्याविषयी मी जास्त बोलणार नाही कारण त्याच्या विषयी माझ्या मनात आजही आदर आहे.
मात्र जनता हुशार आहे. जे मतदार बाजार समीतीत होते त्यांनीच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधकांना भुईसपाट केले आहे. या ठिकाणी आमरस, बिर्याणी आणी फेटे हे अमिष चालत नाही तर या ठिकाणी जनतेला विकास कामांचा करिष्मा चालत असून महसूल आपल्या दारी या कार्यक्रमात फक्त निघोज येथील कार्यक्रमात साडेहजार लोकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला आहे.
सचिन पाटील वराळ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम केले असून तालुक्यातील साडेतीन हजार ज्येष्ठ लोकाना आरोग्य साहित्य देउन भाजपच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी जनविकासाचे काम केले असून हीच विकासाची जननी निरंतर सुरू ठेवण्यासाठी भाजपचे नेतेमंडळी व कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी काम करीत असल्याची ग्वाही खासदार विखे पाटील यांनी दिली आहे.
गेली तीन साडेतीन वर्षात तालुक्यातील जनतेमध्ये असुरक्षित असल्याची भावना मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. पारनेर तालुक्यात तहसीलदार येण्यासाठी घाबरतात पारनेर पेक्षा गडचिरोली बरी अशी प्रतिक्रिया अधिकारी व्यक्त करीत आहेत. ही कशाची लक्षणे आहेत. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी मारहाण होते.
एवढा सत्तेचा माज बरा नाही. महाविकास आघाडी सत्ता तीन वर्षं असताना आमच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी करण्यात आली. त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला. तालुका आज पुर्णपणे असुरक्षित असला तरी आपण हा तालुका सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत सुजित पाटील झावरे , सचिन वराळ सारखे सच्चे दिलाचे कार्यकर्ते ही आपली ताकद आहे.
तालुक्यातील खिलारी , रोहकले आणी वराळ कुटुंब पहिल्यापासून खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर निष्टा ठेउन काम करीत आहे. ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. निवडणुकांच्या माध्यमातून नवीन कार्यकर्ते जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे.भावी हा कधी माजी होईल हे सांगता येत नाही.
यासाठी जनतेचे कामे करीत राहा असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांना थांबवण्याचे काम विखे पाटील यांनी केले आहे.तुमचा पारनेरचा नेता आपल्यासाठी किरकोळ असून सत्तेचा माज जास्त दिवस टिकत नाही. दादागीरीवर राजकारण चालत नाही तर विकासाचे काम हीच खरी जनतेची ताकद आहे.
पारनेरची जनता सुज्ञ असून ही जनता कोनत्याही निवडणुकीत काहीही करु शकते याचा प्रत्यय आला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी यावेळी सचिन पाटील वराळ यांच्या कामाचे कौतुक केले.
तसेच यापुढे सुद्धा खासदार डॉ सुजय विखे पाटील हेच याच मतदारसंघातून खासदार होतील असा ठाम विश्वास व्यक्त करीत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील,माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील ,खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या जनविकास संकल्पनेचे कौतुक करीत नामदार विखे पाटील यांनी शासन आपल्या दारी ही योजना राबवीत महाराष्ट्राच्या लाखो लोकांचे प्रश्न सोडवीले असून विखे कुटुंब हेच राज्यातील जनतेचे तारणहार असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सचिन पाटील वराळ म्हणाले विखे पाटील कुटुंबाने आपल्याला भरभरून दिले आहे. बाजार समितीचे उपसभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंचपद ही सर्व पदे विखे पाटील यांनी दिलेल्या विकासकामातून जनतेने वराळ कुटुंबाला दिले आहेत.
तीस कोटी रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजनेचे काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या आशीर्वादाने सुरु झाले असून लवकरच निघोज - पाबळ मार्गे आळकुटी गारखिंडी या रस्त्याचे बारा कोटी रुपयांचे काम सुरू होणार आहे. याचा पाठपुरावा खासदार डॉ विखे पाटील यांनी केला आहे.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आशीर्वाद सातत्याने आम्हाला मिळत असल्याने निघोज - आळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे. कोणी कितीही वल्गना केली तरी निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटावर भाजपचेच प्राबल्य असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
लहू साबळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शेवटी निलेश घोडे व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे यांनी आभार मानले.
संदीप पाटील वराळ यांनी गेली अनेक वर्षात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अढळ निष्ठा व्यक्त करीत वाहून घेतले होते. असा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत संदीप पाटील वराळ यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करीत संदीप पाटील वराळ यांच्या कार्याचा विखे पाटील यांनी आढावा घेतला.
पारनेर तालुक्यातील तीनशे विद्यार्थ्यांना एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी विखे पाटील ॲकॅडमीमी सुरु करण्याचा निर्णय सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त घेत आहे. हेच त्यांना आमच्याकडून भेट असल्याचे सांगत खासदार डॉ विखे पाटील यांनी सरकार कुणाचेही असो आपल्या तालुक्यातील विद्यार्थी तहसीलदार व अन्य पदावर अधिकारी होतील ही सर्वात मोठी सत्तेची चावी आपल्या तालुक्यातील लोकांकडे असणार आहे. हाच हा विखे पाटील ॲकॅडमीची संकल्पना असल्याने त्यांनी सांगितले.




Post a Comment