मान्यता नसतानाही श्रीगोंद्यात शाळा सुरु.... त्यावर कारवाई होणार का....

श्रीगोंदा : एका नामांकित फाउंडेशनच्या  इंग्लिश स्कूलला शासनाची मान्यता नसतानाही त्यांनी श्रीगोंद्यात शाळा सुरु केली आहे. त्यावरून श्रीगोंद्यातील अनेकांनी त्यावर तक्रार केलेल्या आहेत .


विशेष म्हणजे या शाळेला  गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी नोटीस दिलेली असतानाही त्यांनी त्या नोटीसला न जुमानता शाळा सुरु केलेली आहे.

श्रीगोंद्यात  मोठी सुसज्ज इमारत बांधून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा  स्टाफ, तसेच विद्यार्थ्यासाठी आलिशान गाड्या खरेदी करून जाहीरातबाजी केली. शाळेत पहिली ते सहावीसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शहरासह ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांनी हजारो रुपये फी भरून प्रवेश घेतला आहे.

परंतु या शाळेला मान्यता नसल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शाळेला मान्यता नसल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी या शाळेस लेखी पत्र दिले आहे. 

त्यात या स्कूलला शासनाची मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया तात्काळ बंद करावी. शाळा सुरू करू नये, अन्यथा संस्थेविरुद्ध बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकारानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. असे असतानाही शाळा सुरु करण्यात आली आहे. 

शाळेबाबत अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post