विशाल मोहितेंचे कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

चांदा : नेवासा तालुक्यातील कौठा येथील विशाल खंडू मोहिते यांने जम्मू १४ युवा रत्न नॅशनल चॅपियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकत  घवघवीत यश संपादन केले आहे .


जम्मूमधील तावी येथे झालेल्या १४ युवारत्न चॅपियनशिपमध्ये विशालयाने ५२ किलो वजन गटात भाग घेत या वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सोनई येथील इयत्ता १२वी विज्ञान शाखेचा विशाल विदयार्थी आहे. 

स्टुडंट ऑल गेम्स फेडरेशनच्या वतीने सदर स्पर्धे आयोजन करण्यात आले होते. विशालयाच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post