नगर : बोल्हेगाव येथील नवनाथ मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
29 जून रोजी आचार्य महादेव महाराज गर्जे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हे कीर्तन होणार आहे.
30 जून रोजी निवृत्ती महाराज मतकर यांचे किर्तन आयोजन करण्यात आले आहे. हे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा यावेळेत होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ भजनी मंडळ व नवनाथ भक्त मंडळ प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment